आटपाडी / प्रतिनिधी
लोकसंखेने सर्वाधिक असणारा व विकासाच्या मुख्यप्रवाहात नसणारा ओबीसी भटका विमुक्त समाज महाराष्ट्रात ५२ टक्के आहे. या समाजाला दुय्यम वागणूक देत प्रस्थापितांनी फक्त वापरण्याचं राजकारणं केलं. या समाजासाठी त्यांनी काहीही केलं तर नाहीच. फक्त खोट्या घोषणा करून ओबीसी घटकांची फसवणूक सुरू असून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यासाठी आमदार पडळकर यांनी खुद्द मंत्री वडेट्टीवार यांनाच पत्र लिहून “घोषणाबहाद्दर” असा उपहास केला आहे.
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या काळात वसंतराव नाईक भटके विमुक्त महामंडळ उध्वस्त केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाज्योतीची स्थापना करून तातडीने ३८० कोटींचा निधीही मंजूर केला. आता ठाकरे सरकारच्या कार्यकाळातले सध्याचे महाज्योतीचे अध्यक्ष विजय वड्डेटीवार यांनी या महाज्योती संस्थेचं वाट्टोळं केलं आहे.
ओबीसी, मदत व पुर्नवसन आणि चंद्रपूरचं पालकमंत्रीपद अशे तीन-तीन पदं भुषवूणही यांना महाजोतीचं पद कशाला मिरवायचंय? आणि नागपूर पासून १५० किलोमीटर दूर असणाऱ्या गोंदीया जिल्ह्यातला अधिकारी प्रदीप डांगेला महाज्योताचा अतिरिक्त कार्यभार नेमका दिलाय का? आणि कशासाठी? असा सवाल आमदार पडळकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
Previous Articleअन्यथा वीज बिल भरणार नाही!
Next Article महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले
Related Posts
Add A Comment