श्रावणात काहीतरी वेगळं करून बघायचं असेल तर ऑलिव्ह सॅलड ट्राय करायला हरकत नाही. आपण कोबी, फ्लॉवर, टॉमेटो, काकडी, गाजर, बीट यांचा वापर सॅलडमध्ये करतो. पण वेगळेपणासाठी आरोग्यदायी ऑलिव्हचं सॅलड तयार करता येईल. चविष्ट आणि चटपटीत असं ऑलिव्ह सॅलड तुमच्या जेवणाची लज्जत वाढवेल.
साहित्यः काळे आणि हिरवे ऑलिव्ह 200 ग्रम, लिंबाची सालं, लिंबाचे पातळ काप, 2 तमालपत्रं, एक कप ऑलिव्ह ऑईल, अर्धा टी स्पून बडिशेप, एक टेबलस्पून मिरपूड किंवा ऑरिगॅनो, थोडी पुदिन्याची पानं, चवीनुसार मीठ
कृतीः ऑलिव्हज स्वच्छ धुवून घ्या. सर्व ऑलिव्हज एका कापडावर पसरवून वाळवून घ्या. आता एका कढईत बडिशेप घालून साधरण तीन मिनिटं परतून घ्या. यात लिंबाची सालं आणि पातळ काप घाला. यानंतर तमालपत्रं घालून हलवून घ्या. ऑलिव्हज घालून परतून घ्या. आता यात ऑलिव्ह ऑईल आणि ऑरिगॅनो घाला. हे मिश्रण मंद आचेवर 3 मिनिटं शिजू द्या. शिजल्यावर मीठ घालून नीट मिसळून घ्या. सॅलड गरमच छान लागेल.