बेळगाव :शहरातील विकासकामे काही ठिकाणी पूर्ण झाली आहेत. मात्र, काही ठिकाणी ही कामे अर्धवट असल्याने धोका निर्माण झालेला आहे. चन्नम्मानगर येथील चन्नम्मानगर उद्यानाच्या परिसरात गटारांचे बांधकाम अर्धवट झाले आहे. येथील गटारीचे बांधकाम गेल्या कित्येक दिवसांपासून रखडले असल्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय जवळच उद्यान असल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. तसेच या भागातील गटारींमध्ये झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे गटारांची स्वच्छता लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. याशिवाय चन्नम्मानगर उद्यानच्यासमोर विद्युत खांब गटारीमध्ये पडला आहे. तो खांब बाजूला करण्याकडेही प्रशासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे सर्व समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
Previous Articleन्यू वैभवनगरमधील समस्या सोडवा
Next Article गजानन महाराजनगर परिसरात कचऱयाचे साम्राज्य
Related Posts
Add A Comment