इतर चोरी प्रकरणात हात आहे का चौकशी सुरु
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव-येथील होली स्पिरीट चर्चमधील चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ऍलेक्स मॅथ्यु याला न्यायालयाने 8 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
आरोपी ऍलेक्स मॅथ्यू (39) याला पोलिसांनी तेलंगणा येथून अटक करण्यात आली होती. चोरीची ही घटना 30 जून 2022 रोजी घडली होती. आरोपीने या चर्चेमध्ये प्रवेश करुन सुमारे दीड लाखांची रक्कम पळविली होती. अज्ञात चोरटय़ाने चर्चच्या मागच्या बाजूने पाद्रीच्या खोलीतील कपाट फोडून रक्कम लंपास केली होती.
या चोरी प्रकरणी लुसिओ विक्टर मिनेझीस यांनी फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 454 आणि 380 कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. या चोरी प्रकरणी फातोर्डा पोलीस तपास करीत होते. मात्र, आरोपी हाती लागत नव्हता.
आरोपीने ज्यावेळी चारी केली तेव्हा चर्चमधील सीसीटीव्ही कॅमेऱयात आरोपी कैद झाला होता. आरोपीचे चित्र कॅमेऱयात कैद झाल्यानंतर इतर राज्यात आरोपीचा फोटो गुप्त मार्गाने पाठविण्यात आला होता. आरोपी अमूक ठिकाणी असल्याची खबर मिळाल्यानंतर फातोर्डा पोलीस तेलंगण राज्यात जाऊन आरोपीला जेरबंद केले होते.
आरोपी ऍलेक्स मॅथ्यू हा मूळ केरळचा. पोलिसांनी आरोपीकडून 53,500 रुपये तसेच चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिलेला आहे या दरम्यान आणखी काही चोरी प्रकरणात या आरोपीचा हात आहे का याचा तपास सध्या फातोर्डा पोलीस करीत आहेत अशी माहिती फातोर्डाचे पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी दिली.