भारतात, वसंत ऋतु मार्च महिन्यापासून सुरू होतो आणि मे महिन्यात संपतो. भारताच्या काही भागात, गरम हवामानामुळे लोकांना या हंगामाचा पूर्ण आनंद घेता येऊ शकत नाही. वसंत ऋतु खूपच प्रभावी आहेः जेव्हा येतो, तेव्हा सर्व गोष्टी निसर्गात जागृत होतात; अशा झाडे, वनस्पती, गवत, फुले, पिके, एक लांब झोप हंगामात प्राणी, हिवाळी मानव आणि इतर सजीव पासून जागृत. मनुष्य नवीन आणि हलके कपडे परिधान करतात, नवीन पाने आणि फांद्या फुलझाडांवर येतात आणि रंगीत फुले बहरतात. सर्व शेते गवताने भरली आहेत आणि अशाप्रकारे संपूर्ण निसर्ग हिरवा आणि ताजा दिसतो.

वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे. निसर्गाचे आकर्षण एरवी असतेच. पण वसंत ऋतूत त्याचे सौंदर्य जास्त खुलते. आपल्या या सौंदर्य विशेषाने तो आकर्षित करून घेतो. फक्त त्याकडे उघडय़ा डोळय़ांनी पाहिलं पाहिजे. नेहमीच्या धावपळीच्या जगातून फुरसतीचे क्षण काढून निसर्गाकडे वळायला हवे. निसर्गाच्या माध्यमातून सतत चलित स्थितीत असणाऱया देहाला आराम दिला पाहिजे. निसर्गाकडे एक अजब जादू आहे. त्यामुळे मानवी वेदनांवर त्याचा असा काही असर होतो, की सगळी दुःखे, वेदना पार विसरायला होतात. निसर्गाचे हेच सान्निध्य कायम मिळत राहिले तर मग काय मानवी जीवनात बहरच येईल. साहजिकच त्याचा परिणामही दीर्घकाळ राहील.
निसर्गात अहंकाराचा लवलेश नाही. म्हणूनच तो ईश्वराच्या जवळ आहे आणि त्याचमुळे आपण जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जातो, तेव्हा ईश्वराच्या जवळ गेल्याचा अनुभव येतो. जीवन व वसंताला ज्याने एकरूप केले आहे, अशा व्यक्तीलाच आपली संस्कृती संत म्हणते. जो जीवनात वसंत आणतो, तोच संत असतो.