ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. असे असले तरी दुसरीकडे पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ‘ब्लॅक फंगस’ या आजाराने राज्यात अक्षरशः थैमान घालण्यास सुरूवात केली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत ‘ब्लॅक फंगस’ चे 7 हजार 988 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 729 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 4,398 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात नागपूरमध्ये ‘ब्लॅक फंगस’ रूग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. सद्य स्थितीत नागपूरमध्ये 1296 रुग्ण आहेत. तर पुण्यात हाच आकडा 1187 इतका आहे. औरंगाबादमध्ये 940, नाशिक 529 तर सोलापूरमध्ये हा आकडा 485 इतका आहे.