- सद्यस्थितीत 64 हजार 260 सक्रिय रुग्ण
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. राज्यात मागील 24 तासात 8 हजार 702 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 56 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 लाख 29 हजार 821 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 993 एवढा आहे.

कालच्या एका दिवसात 3744 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 20 लाख 12 हजार 367 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 64 हजार 260 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.49 % तर मृत्युदर 2.45 इतका आहे.
- मुंबईत हजारपेक्षा अधिक रुग्ण

मुंबईत कालच्या दिवसात 1,145 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 463 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,22,843 वर पोहचली आहे. तर 3,01,520 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,458 इतकी आहे. सद्य स्थितीत 8 हजार 997 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.