सैफ अली खान अन् अर्जुन कपूरचा ‘भूत पुलिस’
अलिकडेच चौथ्यांदा पिता झालेला सैफ अली खान याचा चित्रपट ‘भूत पुलिस’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे. हा चित्रपट 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. भूत पुलिसमध्ये सैफसह अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडिस आणि यामी गौतम देखील मुख्य भूमिकेत आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित भूत पुलिस हा चित्रपट हॉरर कॉमेडी धाटणीचा आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण मागील वर्षी हिमाचल प्रदेश तसेच जैसलमेरमध्ये पूर्ण झाले आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर अर्जुन कपूरने प्रसारित केले आहे. अर्जुन कपूरचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट 19 मार्च रोजी मोठय़ा पडदय़ावर झळकणार आहे.