चिपळूण
शहरालगतच्या खेर्डी-दत्तमंदिर परिसरात चोरीच्या उद्देशाने संशयरित्या फिरणाऱया एका तरुणास पाठलाग करत ताब्यात घेत अटक केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
हमीद अहमद शेख (35, काविळतळी-चिपळूण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. एल. चव्हाण हे दोघेजण खेर्डी-दत्तमंदिर परिसरात गस्त घालत असताना त्या ठिकाणी असलेल्या हमीद यांनी पोलीस गाडी पाहताच तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडल्यानंतर त्याच्याजवळ स्क्रू ड्रायव्हर आढळून आला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. एल. चव्हाण करीत आहेत.