प्रतिनिधी / चिपळूण
भिशीचे पैसे कधी देणार, अशी विचारणा केल्याने एका व्यापाऱ्याने एकास जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1.30 च्या सुमारास शहर बाजारपेठेतील एका दुकानात घडली. या प्रकरणी व्यापाऱ्याविरोधात ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लियाकत सलिम मेमन (अब्बास पार्प-गोवळकोट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद अमित जनार्दन चिपळूणकर (34, परांजपे स्किम-रावतळे) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास चिपळूणकर यांच्यासह त्यांची पत्नी सोनाली चिपळूणकर व तबरेज मुजावर हे तिघेजण लियाकत मेमन याच्या शहरातील बाजारपेठतील सना कलेक्शन या दुकानात गेले होते. त्यावेळी त्यांनी मेमन याच्याकडे भिशीचे 4 लाख रुपये कधी देणार, अशी विचारणा केली असता मेमन याने चिपळूणकर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच चिपळूणकर यांच्या पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन धक्का दिला.
या घटनेनंतर चिपळूणकर यांनी पोलीस स्थानकात तकार दिली असून त्यानुसार मेमन याच्यावर शुकवारी रात्री उशिरा ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे करीत आहेत. ते या घटनेनंतर शनिवारी चिपळुणात आले होते.
Trending
- लाच प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करा
- ‘स्टार्ट अप 20 एन्गेजमेंट’ गटाची तिसरी बैठक पणजीत आजपासून
- मोरेवाडीत पाणी वाटपाचे योग्य नियोजन करून अंमलबजावणी करा- ऋतुराज पाटील
- जीवन स्वावलंबी बनवाचंय, मला नोकरी द्या!
- आज वटपौर्णिमा.. सावित्री करणार सत्यवानासाठी प्रार्थना!
- मुख्यमंत्री सावंतांनी घेतला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा
- खोल लक्ष्मीनारायण देवस्थानच्या ज्येष्ठ महाजनांचा सत्कार
- गोकुळदास शिरोडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते