मुंबई/प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी चिपी विमानतळाच्या (sindhudurg chipi airport) उद्घाटनाची माहिती देताना सोहळ्याला मुख्यमंत्री असावेच असं काही नाही, असं म्हटलं होतं. त्यांनतर राणेंच्या या वक्त्यव्यावर टीका करण्यात आली.होती. आता तर चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच मंचावर असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं लोकार्पण होणार आहे.
दरम्यान, चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं काही नाही, असं केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्याच चिपी विमानळाचं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चिपी विमानतळाच्या उद्घघाटनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याची कार्यक्रम पत्रिकाही छापण्यात आली आहे. कार्यक्रम पत्रिकेनुसार येत्या ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं लोकार्पण होणार आहे. त्याच दिवशी 12.30 वाजता या विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे.