जिनेव्हा : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुखांनी चीनमधील मानवाधिकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या शिनजियांग क्षेत्रात मानवाधिकाराची व्यापक समीक्षा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. चीनमधील कार्यकर्ते, वकील आणि मानवाधिकाराचे रक्षण करणाऱयांवर चुकीचे खटले दाखल करुन त्यांना बंदीस्त करण्यात येत असल्याची माहिती आहे. संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार विभागाचे आयुक्त मिचशेट बॅशलेट यांचे कार्यालय हे शिनजियांग प्रवासासाठी परस्पर सहमती असणाऱया केंद्रावर काम करत आहे. यामध्ये जगभरातील मानवाधिकाराच्या स्थितीवर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेला आपली नियमीतपणे ब्यूरो देत चीनच्या विषयांवर चर्चा घडवून आणण्याचे काम करत आहे. कोरोना कालावधीनंतर आपले अधिकार आणि नागरिक स्वतंत्रता यावर निर्बंध लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा ठपका चीनवर ठेवल्याचे नमूद केले आहे.
Previous Articleप्ले-ऑफमधील चौथ्या स्थानासाठी आज गोवा-हैदराबाद लढत
Next Article बायडेनचा पहिला वार सौदी अरेबियावर
Related Posts
Add A Comment