केरी, सांखळी, पर्ये भागातील व्यवसाय तीव्रगतीने होणार वाढ

प्रतिनिधी /वाळपई
गोवा – बेळगाव दरम्यानच्या चोर्ला रस्त्याचे 7 मीटरने रुंदीकरण होणार असल्यामुळे सांखळी- केरी रस्त्याच्या बाजूला असलेली अनेक बांधकामांवर कुऱहाड कोसळण्याची शक्मयता निर्माण झालेली आहे. यामुळे सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसऱया बाजूने रस्ता रुंदीकरणामुळे वाहतुकीचे प्रमाण वाढणार असून त्याचा अनुकूल तेथील स्थानिक व्यवसायिकांना होणार असल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अनेक बांधकामे पाडावी लागणार.
अधिक माहितीनुसार, साखळी ते केरी रस्त्याच्या बाजूला अनेक बांधकामे आहेत. सदर बांधकामे करताना पंचायतीने हरकत घेण्याची गरज होती मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. सांखळी नगरपालिका क्षेत्रात अनेक बांधकामे नवीन स्वरूपाची झालेली आहेत. रस्ता रुंदीकरण प्रक्रिया हाती घेताना मोठय़ा प्रमाणात अनेक बांधकामावर संक्रात येण्याची शक्मयता आहे. जवळपास 150 पेक्षा जास्त बांधकामे पाडण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. दोन्ही बाजूने जवळपास दीड मीटर रस्ता रुंद होणार आहे .त्याचप्रमाणे रस्त्यापासून ठराविक अंतरावर बांधकामे असू शकत नाहीत. या मार्गदर्शक तत्त्वा?ची अंमलबजावणी न केल्याने मात्र अनेकांवर बांधकामे पाडण्याची संक्रांत येणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
अनेकांची बांधकामे सावरण्यासाठी धावपळ.
दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी पासून या कामाचा शुभारंभ बेळगावातून होणार आहे. यामुळे येणाऱया केरी, साखळी दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण हाती घेतल्यानंतर अनेकांना आपल्या बांधकामावर पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे सध्या तरी आपली बांधकामे सावरण्यासाठी धावपळ सुरू झाल्याची माहिती हाती आलेली आहे. मात्र केंद्रीय भूपृ÷ मंत्रालयाने सदर प्रस्ताव मंजूर केल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बांधकामांना अभय प्राप्त होणार नसल्याची माहिती हाती आलेले आहे .यामुळे अनेकांची बांधकामे पाडावी लागणार असून यामुळे कोणत्याही स्तरावर दबावतंत्राचा वापर हा वायफळ होऊ शकतो अशा प्रकारची प्रतिक्रिया राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेचे अधिकारी सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.
व्यवसायात मात्र होणार वाढ
केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने या रस्त्याचे रुंदीकरण हाती घेण्याचे निश्चित केल्यामुळे दरम्यानच्या मार्गाच्या शेजारी असलेल्या अनेक व्यवसायाला चांगली संधी प्राप्त होणार असल्याचे समजते. कारण हा रस्ता रुंद झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात वाहतूक या रस्त्याने होण्याची शक्मयता आहे. त्याच प्रमाणे गोव्याची जनता मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारच्या बाजारपेठेसाठी बेळगाव भागांमध्ये जात असतात .यामुळे त्यांची संख्या वाढल्यास रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यवसायिकांना चांगल्या प्रकारची व्यवसायाची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती व्यवसायिकांना प्राप्त होणार आहे. यामुळे येणाऱया काळात या रस्ता रुंदीकरणाच्या माध्यमातून आर्थिक उलाढालीचा वेग वाढण्याची शक्मयता आहे.
एकेकाळी ओसाड पडलेला केरी भागातील व्यवसाय आज मोठय़ा प्रमाणात विकसित होताना दिसत आहे. गोवा सरकारने आपल्या हद्दीमध्ये असलेला हा महामार्ग नुकताच नव्याने डांबरीकरण केलेला आहे .यामुळे वाहतुकीचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचा अनुकूल परिणाम केरी पर्ये साखळी भागातील व्यवसायिकांना झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येणाऱया रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या माध्यमातून व्यवसायाला आणखी संधी प्राप्त होणार असल्याने आर्थिक उलाढाल मोठय़ा प्रमाणात होऊ शकते असा अंदाज आहे.