फॅशनचे देखील काहीसे विज्ञानासारखे असते. हे असेच का, तसे का नाही, असे प्रश्न विचारले, की आपसूक नवनवीन उत्तरं सापडतात. चप्पलची सोल, म्हणजेच तळ हा आपल्या पायाच्या आकाराप्रमाणे निमुळता असतो. चालताना योग्यप्रकारे पाऊल पडावे म्हणून अशी योजना केलेली असते. पण डिझायनर्स मुळात कल्पक असतात. त्यांनी यात प्रश्न विचारून तळ असाच का, वेगळा का नाही असा प्रश्न विचारला. मग आले चप्पलचे वेगवेगळय़ा आकारातील सोल. त्यातही सध्या लोकप्रिय ठरलाय तो चौकोनी आकार. गेले काही महिने निमुळत्या, टोकदार सोल्सनी गाजवले होते. आता चौकोनी सोल्स जिकडे तिकडे पाहायला मिळत आहेत. फक्त चप्पलच नव्हे तर बूट, म्यूल्स, पम्प्स अशा प्रकारातही चौकोनी सोल्स पाहायला मिळत आहेत. चौकोनी सोल्स्मध्ये एखाद्या कॅनव्हासवर रेखाटावे तशी आपली पावले उठून दिसतात. त्यामुळे पावलांची चांगली निगा घेणे आवश्यक असते. ज्या चप्पल व बुटासाठी चौकोनी सोल वापरलेले असतात त्यात फारसे डेकोरेशन केलेले आढळत नाही. कारण मुळात चौकोनी सोल स्वतःच लक्षवेधी ठरतात. त्यावर पुन्हा गोंडे, लेस असे काही लावायची गरज नसते. हाय हिल्स व फ्लॅट्स अशा दोन्ही प्रकारात चौकोनी सोल्स छान दिसतात.
Previous Articleकोरोना संकटात आरबीआयचा डोस, रेपोदरात कपात; कर्जे स्वस्त
Next Article शेतकऱयांच्या हितासाठीही निर्णय व्हावेत : शरद पवार
Related Posts
Add A Comment