बाजार नव्या उंचीवर : जागतिक सकारात्मक प्रभावाचा परिणाम
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात गुरुवारी बीएसई सेन्सेक्सने 958 अंकांची झेप घेतली असून ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी असल्याची नोंद केली आहे. यामध्ये जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळे भारतीय शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग मजबूत होत बंद झाले आहेत.
दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 958.30 अंकांनी वधारुन 1.63 टक्क्यांनी तेजी प्राप्त करत निर्देशांक 59,885.36 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 276.30 अंकांनी वधारुन 1.57 टक्क्यांसोबत निर्देशांक 17,822.95 वर बंद झाला आहे. ट्रेडिंगदरम्यान निर्देशांक 17,843.90 वर कार्यरत राहिला होता.
प्रमुख कंपन्यांमध्ये प्रामुख्याने बजाज फिनसर्व्हचे समभाग चार टक्क्यांनी तेजीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये लार्सन ऍण्ड टुब्रो, एचडीएफसी, ऍक्सिस बँक, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडसइंड बँक यांचे समभाग मजबूत स्थितीत राहिले होते. दुसऱया बाजूला डॉ.रेड्डीज लॅब, आयटीसी, नेस्ले आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
देशातील बाजारात चौथ्या सत्रात गुरुवारी तेजी परतली आहे. यामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक नव्या उंचीवर राहिले आहेत. अमेरिकेतील फेडरल ओपन मार्केट समितीची बैठक बुधवारी झाली असून त्याचा हा अनुकूल परिणाम राहिल्याचे दिसून आले आहे. रियल इस्टेट कंपनी एव्हरग्रँडना चीन सरकार दिलासा देणार असल्याचे संकेत असल्यामुळे याचा फायदा भारतीय बाजाराला झाल्याने रिलायन्सने बाजारात दबावाचे वातावरण निर्माण केले होते.
प्रमुख क्षेत्राची कमाई
गुरुवारच्या सत्रात प्रामुख्याने धातू, आयटी तसेच वाहन क्षेत्रातील समभागात तेजी राहिली होती.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- बजाज फिनसर्व्ह 18519
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1770
- एचडीएफसी. 2817
- ऍक्सिस बँक…. 812
- स्टेट बँक……… 449
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2489
- इंडसइंड बँक. 1169
- एचडीएफसी बँक 1570
- आयसीआयसीआय 717
- कोटक महिंद्रा 2024
- इन्फोसिस…. 1741
- बजाज फायनान्स 7897
- एनटीपीसी….. 126
- टाटा स्टील… 1319
- बजाज ऑटो.. 3791
- टायटन…….. 2104
- पॉवरग्रिड कॉर्प 178
- एचसीएल टेक 1327
- महिंद्रा ऍण्ड महिंदा 758
- टेक महिंद्रा… 1521
- मारुती सुझुकी 6844
- टीसीएस…… 3868
- सन फार्मा…… 770
- एशियन पेन्ट्स 3320
- अल्ट्राटेक सिमेंट 7624
- पिरामल एन्टर 2778
- हिंडाल्को…….. 482
- टाटा पॉवर….. 743
- अपोलो हॉस्पिटल 5094
- कोल इंडिया…. 167
- डिव्हीस लॅब. 5213
समभाग घसरलेल्या कंपन्या
- डॉ.रेड्डीज लॅब 4796
- आयटीसी……. 242
- नेस्ले………. 19855
- हिंदुस्थान युनि 2781
- भारती एअरटेल 726
- कोलगेट……. 1704
- एसीसी…….. 2352
- ब्रिटानिया…. 4045
- सिमेन्स…….. 2165
- बीपीसीएल 419