शिवसेनेतर्फे शिवाजी उद्यानात कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची 341 वी पुण्यतिथी मंगळवारी गांभीर्याने आचरण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, शहर प्रमुख दिलीप नौकुडकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, भोगण मामा, बाळासाहेब डंगरले, नारायण पाटील, सौरभ पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.