जलतरणपटूंकडून स्वागत; ऐन उन्हाळय़ात पोहण्याची संधी
कोल्हापूर प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवरील जलतरण तलाव मंगळवारी पूर्ववत पोहण्यासाठी खुला करण्यात आला. कोरोनाच्या संकटकाळातील निर्बधामुळे हा तलाव पोहण्यासाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. पेहण्यासाठी तलाव पुन्हा सुरू करण्यात आल्याने जलतरणपटूंसह हौशी पोहणाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जिल्हा क्रीडा संकुलच्या व्यवस्थापनाखाली या जलतरण तलावाचे संचलन चालते. कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी तलाव पोहण्यास बंद केल्याने जलतरमपटूंसह पोहणास येणाऱयांची अडचण झाली होती. तलाव सुरू करण्याचीही मागणी जोर धरू लागली होती. राज्य शासनाने कोरोनाच्या संदर्भात असणारे निर्बंध मागे घेतल्यानंतर आता जलतरण तलावही पोहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. मंगळवारी जिल्ह क्रीडाधिकारी तथा जिल्हा संकुल समितीचे सचिव चंद्रशेखर साखरे यांच्या हस्ते तलाव पुन्हा सुरू करण्यात आला. यावेळी क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी, सुधाकर जमादार, शिवराज गुरव, गौरव खामकर, श्रीपती पाटील, प्रशिक्षक प्रभाकर डांगे उपस्थित होते