मुंबई \ ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. यानंतर सर्व देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील फेसबुक पोस्ट करत ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, जख्मी वाघिणीच्या पंजाने चौकीदार झाला घायाळ ! पश्चिम बंगाल मधील निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल #ममता #दीदींचं #अभिनंदन !त्यांनी आता देशातील भाजप विरोधी आघाडीचं नेत्तृत्व करावं, असे त्यांनी म्हटले आहे.
विजयानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातून शुभेच्छां वर्षाव होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, पीडीपी प्रमुख महबुबा मुफ्ती, शिवसेना नेते संजय राऊत तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, राज ठाकरे , आदी नेत्य़ांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी केला पराभव
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती. पण नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला.
