ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात मागील 24 तासात 1 लाख 76 हजार 568 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी पार गेली आहे. जगभरात आतापर्यंत 1 कोटी 81 हजार 545 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 5 लाख 01 हजार 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
जगभरातील 1 कोटी 81 हजार कोरोना बाधितांपैकी 54 लाख 58 हजार 369 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 41 लाख 21 हजार 878 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 57 हजार 748 केसेस गंभीर आहेत.
सर्वाधिक कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 25 लाख 96 हजार 537 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 28 हजार 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमध्ये 13 लाख 15 हजार 941 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 57 हजार 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. रशियात 6 लाख 27 हजार 646 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8 हजार 969 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.