ऑनलाईन टीम / सुलैबिया :
कुवेतच्या सुलैबिया शहरात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या जुन्या टायरच्या इम्पयार्डला आग आगली आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून या आगीचा व्हिडिओ आणि फोटो टिपण्यात आले आहेत.
आग लागलेल्या जुन्या टायर्सच्या इम्पयार्डमध्ये जवळपास 70 लाख टायर्स होते. कुवेत सरकारने वाळवंटात या टायरची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी चार कंपन्यांना दिली होती. मात्र, या इम्पयार्डला चार दिवसांपूर्वी आग लागल्याने भागात विषारी धुराचे साम्राज्य पसरले आहे. टायर जळल्याने कार्बन मोनोऑक्साइड आणि सल्फर ऑक्साईडसारखी रसायने बाहेर पडत आहेत. या रसायनांमुळे श्वसनाचे आजार आणि कर्करोगाचा धोका वाढला आहे. या समस्येमुळे सध्या कुवैतमध्ये चिंतेचे वातावरण आहे.