ऑनलाईन टीम/तरुण भारत
कानपूरमध्ये व्यवसाय करणाऱ्या पियूष जैन यांच्यासी संबंधित मालमत्तांवर ही छापेमारी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल १५० कोटींची रोख रक्कम लागली आहे. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा फोटो समोर आला असून यामध्ये नोटांचे ढीग दिसत आहेत. एका फोटोत कपाट नोटांनी भरल्याचं दिसत आहे. नोटा मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना सहा यंत्रे न्यावी लागली. जैन यांचे कन्नौज येथील घर सील करून मुलगा प्रत्युषला अटक करण्यात आली आहे.
जैनने अलिकडेच ‘समाजवादी अत्तर’ लाँच केले होते. त्याच्या नावावर सुमारे ४० कंपन्या आहेत. त्यात काही शेल कंपन्यांचा समावेश आहे. नोटांनी भरलेल्या कपाटांमध्ये ५०० रुपयांची बंडले होती. तिथे आढळलेली रोख रक्कम पाहून कारवाईत प्राप्तिकर खात्याला सहभागी करून घेण्यात आले. जप्त रक्कम कंटेनरमधून आरबीआयमध्ये नेली.