श्रीनगर
जम्मूमधील आयुर्वेद रुग्णालयामध्ये ओपीडी पुन्हा सुरू करण्यासाठी ‘क्वारंटाईन केंद्र’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता रुग्णांसाठी नियमितपणे ‘ओपीडी’ (बाहय़रुग्ण विभाग) सुरू करण्यात येणार आहे.
आयुर्वेद रुग्णालयात बनविण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्रात जम्मू शहराव्यतिरिक्त अन्य जिल्हय़ांमधून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसांत क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींमध्येच कोरोनाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये नियमित ओपीडी सुरू करण्याचे आदेश दिले होते. आयुर्वेद रुग्णालयात ओपीडी सुरू करण्यात आली होती. यामध्ये येणाऱया रुग्णांची संख्या कमी होती.