- दिवसभरात 507 नवे कोरोना रुग्ण; 9 मृत्यू
ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 507 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 00 हजार 351 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 181 आणि काश्मीर मधील 326 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 433 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 93,313 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 37724 रुग्ण जम्मूतील तर 55,589 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1558 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 524 जण तर काश्मीरमधील 1034 जणांनी आपला जीव गमावला आहे.