ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 512 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 09 हजार 383 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 300 आणि काश्मीर मधील 212 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 112 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 632 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,02, 591 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 41,096 रुग्ण जम्मूतील तर 61, 495 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1680 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 581 जण तर काश्मीरमधील 1099 जणांनी आपला जीव गमावला आहे.