ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 626 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 01 हजार 594 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 197 आणि काश्मीर मधील 429 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 645 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 551 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 94,375 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 38,147 रुग्ण जम्मूतील तर 56,226 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1574 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 531 जण तर काश्मीरमधील 1043 जणांनी आपला जीव गमावला आहे.