वृत्तसंस्था/ बर्लिन
कोरोना विषाणूच्या थैमानामुळे क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. जागतिक क्षेत्रातील सर्व महत्वपूर्ण क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. कोरोनाचा हा फटका मोटे जीप शर्यतीलाही बसला असून जून व जुलै महिन्यात होणाऱया जर्मन व डेन्मार्कमधील या शर्यती रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. नियोजीत वेळेनुसार जर्मनीमधील शर्यत 21 जून रोजी, डेन्मार्कमधील 28 जून तर फिनलँडमधील शर्यत 5 जुलै रोजी होणार होती. पण, सध्या युरोपमध्ये कोरोनामुळे हजारो लोकांना जीव गमवावा लागला आहे. अशा संकटमय स्थितीत या शर्यती रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आयोजकांनी सांगितले.