बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात भाजप नेतृत्व बदलाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. याविषयी अनेक भाजप नेत्यांनी भाष्य केले आहे. परंतु नेत्यांनी राज्यात नेतृत्व बदल होणार नसल्याचे म्हंटले आहे. यातच मडिकेरीचे आमदार एम. पी. आप्पाचू रंजन म्हणाले की मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा अजूनही त्यांचे नेते आहेत. जर मुख्यमंत्री बदलले तर त्यांना मंत्रिपद मिळेल.
दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलण्याविषयी चर्चा होत आहेत. नेतृत्व बदलल्याच्या चर्चेमुळे आम्ही दुखावले गेलो आहे. आम्हाला काही माहित नाही हाय कमांड कधी निर्णय घेणार आहेत. “
एम. पी. आप्पाचू रंजन हे मडिकेरी येथून पाच वेळा आमदार राहिले आहेत. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेनंतर त्यांनी आता मंत्री होण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केली. “मी पाच वेळा निवडणुका जिंकल्या आणि मुख्यमंत्री बदलले तर मंत्रिमंडळही बदलले जाईल. तथापि, सर्व काही उच्च कमांडच्या निर्णयावर अवलंबून आहे आणि मी त्याचे पालन करेन, ”असे ते म्हणाले.