प्रतिनिधी /पणजी
गोवा पोलीस खात्यात आयपीएस अधिकारी जस्पाल सिंग यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला हे 31 ंमार्च रोजी सेवा निवृत्त होणार असून त्यांच्या जागी जस्पाल सिंग हे 1 एप्रिलपासून गोवा पोलीस महासंचालक पदाचा ताबा स्विकारणार असल्याचा आदेश केंद्रीय गृहखात्यातून जारी करण्यात आला आहे.
आयपीएस पोलीस अधिकारी जस्पाल सिंग हे 1996 बॅचचे असून त्यांना नुकतीच पोलीस महासंचालकपदी बडती मिळाली आहे. बडती मिळाल्यानंतर त्यांची गोव्यात बदली करण्यात आली आहे. जस्पाल सिंग यांनी दिल्लीसह मिझोरम, अंदमान निकोबा तसे इतर अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. गोवा पोलीस खात्यातही त्यांनी या अगोदर पोलीस महानिरीक्षक म्हणून सेवा बजावलेली असल्याने त्यांनी गोवा सुपरीचित आहे. सादे रहाणीमान आणि उच्च विचारसरणी सगळ्यांना समजून घेणारे असे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची गोव्यात ओळख निर्माण झाली होती. येत्या एक एप्रिल पासून जस्पाल सिंग हे आपल्या नव्या पदाचा ताबा स्विकारणार आहेत.