ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आज 12 मे, जागतिक परिचारिका दिन. वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. या निमित्त काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत देशातील सर्व नर्सेसना शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्या सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा जे जगातील दुःख आणि पीडा दूर करत आहेत. आम्ही तुमच्या योगदानाला सलाम करतो आणि तुमच्यामधील परोपकारी भावनेचे कौतुक करतो. सर्वांचे मनापासून धन्यवाद!
- नितीन गडकरी म्हणाले…

राहुल गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस नेता सचिन पायलट यांनी देखील परिचारिका दिनानिमित्त ट्विट केले आहे. नितीन गडकरी म्हणाले की, कोरोना विरुद्धच्या लढाईत या देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व परिचारिकांना माझा सलाम आणि सर्वांचे मनापासून आभार!
- सचिन पायलट यांचे ट्विट…
सर्व नर्सेसचे मनापासून आभार! जे या कठीण परिस्थितीतही अधिक मेहनतीने आपले कर्तव्य इमानदारीने निभावत आहेत. या सर्व नर्स नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. राष्ट्र आणि मानवता सदैव त्यांच्या ऋणी राहतील.