प्रतिनिधी/ रत्नागिरी
जगप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर’ ह्यांचे रत्नागिरी येथे लॉक डाऊन नंतर सर्व कुटुंबासाठी सुरक्षित जादूचे प्रयोग सूर नवा ध्यास नवा ,कॉमेडी एक्सप्रेस , ABP माझा कट्टा, खाली डोकं वर पाय,आम्ही सारे खवय्ये ,खुपते तिथे गुप्ते आणि चला हवा येऊ द्या वर गाजलेले नवीन जादूचे प्रयोग बघण्याची संधी ः
• शनिवार 6 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजता आणि • रविवार 7 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता स्वातंत्रवीर सावरकर नाटय़गृह ,रत्नागिरी येथील भव्य नाटय़गृह मध्ये होणार आहेत. सुट्टीसाठी 2 दिवसात 2 खास जादूच्या प्रयोगाचे आयोजन केले आहे. जादूगार रघुवीर-विजय-जितेंद्र रघुवीर पिता-पुत्रांचा हा विक्रमी 15616 आणि 15617 वा प्रयोग असल्याचे जितेंद्र रघुवीर यांनी सांगितले. गेल्याच रविवारी पुणे येथे.दोन हाऊसफुल्ल शो ने सुरुवात केल्यानंतर रत्नागिरी येथील जादू प्रेमी रसिकांना हे कार्यक्रम बघण्याची संधी संयोजक विकास पावसकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. 11 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सादर केला जाणारा रत्नागिरीतील पहिला पॅमिली ओरिएंटेड शो तो ही संपूर्ण सुरक्षितता पाळून. ङअल्टरनेट सिटिंग *Hiquf Sanitization * Temperature ,Oxygen Check
ह्या शो मध्ये नवीन पद्धतीने माणसाचे दोन तुकडे करून परत जोडणे, मायक्रोवेव्ह मॅजिक, रिंग ओ मॅजिक ,स्वॉर्ड पॅबिनेट , Tick Tack ऊदा अनेक नवीन जादू तसेच शून्यातून विश्वनिर्मिती, आर्म इल्युजन, हुदिनी बॉक्स, टय़ूब झ्याक, प्रेक्षकातील मुलगी हवेत अधांतरी नोटांचा पाऊस, इrाहम्प् उल्ग्त्त्दूग्हा, स्टेजवराचा माणूस क्षणार्धात गायब,मास्टर ऑफ प्रेडिक्शन असे एक से एक सुरस असे प्रयोग बघायला मिळतील. सप्तरंगी स्वप्नं सृष्टी सोबत हवेतून उडत येणारी चेटकीण आणि भुताचा नाच हे पण एक खास आकर्षण ह्या 2 शो मध्ये पहावयास मिळेल. 2.5 तासाचा जादूचा प्रयोग सुमधुर संगीत ,नेत्रदीपक लाइट्स ,आकर्षक वेशभूषा आणि 50 ङइजिप्सियन, अमेरीकन, जापनीज , अरेबिक जादूचे चित्तथरारक प्रयोग या वेळेस अनुभवता येतील.
रघुवीर कुटुंबियांच्या ह्या 4 पिढय़ा आणि 80 वर्षाच्या जादू आणि रंगभूमी वरील योगदानासाठी रघुवीर यांना कला-तीर्थ पुरस्कार आणि कला-गौरव,बालगंधर्व पुरस्कार ,भारतीय जादूगार परिषद , ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट ,अमेरिकन नेव्ही ,युनाइटेड नेशन्स तसेच अखिल मराठी नाटय़परिषद यांनी ह्या शो ला सन्मानित केले आहे शनिवारी संध्यकाळी ठीक 5 वाजता मारुती मंदिर सर्कल पासून ते बाजारपेठ ,रामआळी पासून सावरकर पुतळ्या पर्यंत जादूगार जितेंद्र रघुवीर हे डोळ्यावर पट्टी बांधून भर गर्दीत मोटरसायकल चालविणार आहेत. ज्यांना हार फुलं घेऊन स्वागत करायला उभा राहायचा आहे त्यांनी या मार्गावर रस्त्याच्या मधोमध उभे रहावे. गाडी आपल्या पाशी थांबेल. हार फुलांचा स्वीकार करून पुढे जाईल. .तरी जास्तीत जास्त उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे आवाहन संयोजक विकास पावसकर यांनी केले आहे.