बेळगाव : जितो बेलगाम लेडीज विंग आयोजित क्रिकेट स्पर्धेचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यापीठमध्ये चौथे स्थान मिळविलेली जलतरणपटू तन्वी दोड्डण्णावर हिचा खास गौरव करण्यात आला.
सदर क्रिकेट स्पर्धेच्या वेळी जलतरणपटू तन्वी दोड्डण्णावर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते महिला क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जितो बेलगाम लेडीज विंग संघटनेतर्फे तन्वी दोड्डण्णावरने जलतरण क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल तिचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी मयुरा शिवालकर, भारती हरदी, रजत हरदी, पुष्पक हणमण्णावर, अमोघ निलजगी, अरूणा शहा, शिल्पा हजारे, दीपाली पत्रावळी आदी उपस्थित होते.