प्रतिनिधी / पणजी :
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांच्या निर्देशानंतर करंजाळे किनाऱयावर पारंपरिक मच्छिमारांकडून नियमांनुसार सामाजिक अंतर राखून मासे विक्री करण्यात सुरूवात झाली आहे. मासे विकण्यासाठी एक विशेष मंडपही बांधण्यात आला आहे. सदर स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मनपा कर्मचारी तसेच मच्छीमार खात्याचे कर्मचारी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
मागील आठवडय़ात करंजाळे येथील किनाऱयावर रापणकारांनी मासेमारी केल्यानंतर मासे खरेदीसाठी लोकांची झुंबड उडालेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. मासे खरेदी करताना लोकांनी सामाजिक अंतराच्या नियमांची एwशीतैशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी याठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली होती. अशाप्रकारची कृती पुन्हा होऊ नये यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी तातडीची बैठक बोलावून या बैठकीत मच्छीमारांना सामाजिक अंतर राखून आणि मंडप घालून मासे विक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे मच्छीमारांनी याठिकाणी प्रशस्त मंडप बांधून आणि सामाजिक अंतर राखून मासे विक्री करण्यास सुरूवात केली आहे. मनपाही यावर जातीने लक्ष देत आहेत. 10CA