ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह 11 जणांची बिनविरोध निवड झाली आहे. उदयनराजे यांची गृहनिर्माण आणि दूध उत्पादक संस्था मतदार संघातून तर आ. शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा तालुका विकास सेवा सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवड झाली.
उदयनराजे यांच्याविरोधात ज्ञानदेव पवार, दिलीप सिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी तर शिवेंद्रराजेंविरोधात विनय कडव, पांडूरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रराजे यांच्यासह 11 जणांची बिनविरोध निवड झाली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले संचालक
खरेदी विक्री – आमदार मकरंद पाटील
कृषी प्रक्रिया – शिवरूपराजे खर्डेकर
गृहनिर्माण – खासदार उदयनराजे भोसले
भटक्या विमुक्त जमाती – लहू जाधव
अनुसूचित जाती जमाती – सुरेश सावंत
औद्योगिक व विणकर – अनिल देसाई बिनविरोध
प्राथमिक कृषी पतपुरवठा गट मतदारसंघ
सातारा – आमदार शिवेंद्रराजे भोसले
फलटण – रामराजे नाईक-निंबाळकर
खंडाळा – दत्तानाना ढमाळ
वाई – नितीन पाटील
महाबळेश्वर – राजेंद्र राजपुरे