झारखंडवरुन परतलेल्यांना कोरोनाची बाधा, सहा पुरुष तर सात महिलांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना पॉझिटिव्हची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी झारखंडवरुन परतलेल्या 13 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता बाहेरुन आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे क्वारंटाईनमध्ये असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरु लागले आहे. अजूनही परराज्यातून नागरिक येत आहेत. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे.
अथणी तालुक्मयातील सवदी, नंदगाव, झुंजरवाड या गावातील हे रुग्ण आहेत. देवदर्शनासाठी हे झारखंडला गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकले. काही दिवसांपूर्वी ते अथणी तालुक्मयात दाखल झाले. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचे स्वॅब प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने अधिक दक्षता घेतली आहे. झारखंडहून आलेल्या सहा पुरुष तर सात महिलांचा समावेश यामध्ये आहे.
राज्यामध्ये मंगळवारी 101 कोरोनाबाधित आढळले
बेळगाव जिल्हय़ात 135 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 94 जण बरे झाले आहेत. 48 जण उपचारात आहेत तर एका 80 वषीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये मंगळवारी 101 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 43 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 1489 जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यामध्ये एकूण 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2283 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. बागलकोट जिल्हय़ातील 8 जणांवर बेळगाव हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू आहेत.
मंगळवारी सापडलेले सर्व जण अथणी तालुक्मयातील आहेत. ते झारखंडला गेले होते. त्या ठिकाणाहून परतल्यानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणी अहवाल आले असून हे 13 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. यामुळे आता अथणी तालुक्मयातही सतर्कता बाळगण्यात आली आहे.