कोयनानगर
पाटण तालुक्यासह जिल्हय़ाला रविवारी 23 मे रोजी सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची कोयनानगर येथे 3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद झाली असून केंद्रबिंदू कोयनेपासून 20 किलोमीटर अंतरावर होता. हा भूकंप जाणवला नसल्याने या भूकंपाचे स्वरूप समजू शकले नाही. यापूर्वी 20 एप्रिलला कोयना परिसरात तीन मिनिटांच्या फरकाने सलग दोन भूकंपाचे धक्के जाणवले होते. या धक्क्याने कोयना धरणास कोणताही धोका झाला नसल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.