मत्स्य विभागाची कारवाई
प्रतिनिधी / रत्नािगरी
जिह्याच्या जलधी क्षेत्रामध्ये विनापरवाना मासेमारी करणाऱया परप्रांतीय नौकेवरील एलईडी लाईटचे साहित्य जप्त करुन ही नौका बंदरामध्ये ताब्यात ठेवण्यात आल्याची माहिती मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त ऩा व़ि भादुले यांनी दिल़ी
सोमवारी भगवती बंदरदरम्यान जिह्याच्या 3 नॉटीकल मैल सागरी क्षेत्राच्या हद्दीमध्ये अनधिकृतपणे मासेमारी करणारी नौका मत्स्य विभागाच्या गस्तीनौकेला आढळल़ी ही नौका अनधिकृतपणे एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करत होत़ी गस्तीवरील गुहागर परवाना अधिकारी संतोष देसाई व परवाना अधिकारी स्मितल कांबळे सागरी सुरक्षारक्षक व पोलिसांच्या सहाय्याने ही नौका पकडण्यात आली.़ तपासणीमध्ये ही नौका गोवा राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल़े मत्स्य विभागाने या नौकेवरील एलईडी लाईटसचे साहित्य जप्त केले असून ही नौका बंदरामध्ये ताब्यात ठेवण्यात आली आह़े पुढील कारवाईसाठी या नौकेच्या मालकावर अभिनिर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कोर्टात प्रतिवेदन दाखल करण्यात आल़े