प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात मागील 24 तासामध्ये तब्बल 155 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत़ यामुळे जिह्यातील कोरानाबाधितांची एकूण संख्या 11 हजार 262 झाली आह़े 54 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े वेगाने वाढणाऱया रुग्णसंख्येमुस्नागरिकांची भिती व यंत्रणेसमोरचे आव्हानही वाढले आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालायकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 828 कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 111 तर ऍन्टीजेन चाचणीत 44 असे एकूण 155 रूग्ण आढळल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 56, दापोली 5, खेड 9, चिपळूण 35, गुहागर 27, संगमेश्वर 18, मंडणगड 1, लांजा 2, राजापूर 2 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 11 हजार 262 झाली आह़े मागील 24 तासात 54 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची संख्या 10 हजार 204 व बरे होण्याचे प्रमाण 90.60 झाले आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रूग्णांमध्ये वेगाने वाढ होत आह़े
गुहागरात एकाच गावातील 15जण पॉझिटिव्ह
एका बाजूला कोरोना लसीकरण सुरू असताना दुसऱया बाजूला गुहागर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारपर्यंत ही संख्या 77वर पोहोचली आहे. यामध्ये एकाच गावातील 15जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या 15 दिवसांत तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. एका खेडेगावांमध्ये राजस्थानवरून आलेली 15 वर्षाची युवती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्या आधी त्या गावात एकाचा मृत्यू झाल्याने 51 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्यातील 30 जणांचे अहवाल आले असून यामध्ये 12 जण पॉझिटिव्ह आढळले असून अजून 21 जणांचा अहवाल येणे शिल्लक आहे. आणखी 6जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. शुक्रवारी त्याच गावातील दुसऱया वाडीतील 15 वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्याच्या घरच्या नऊजणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. याच गावातील एक रुग्ण डेरवण येथे उपचार घेत असताना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी होणार आहे. पॉझिटिव्ह आलेल्यापैकी तिघेजण बाहेर तर 74 जण घरीच उपचार घेत आहेत.