प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनामुळे आणखी 33 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े मंगळवारी जिह्यात 554 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत़ यामुळे जिह्याचा पॉ†िझटिव्हिटी रेट 7.43 वरून आता 9.12 पर्यंत वाढला आह़े त्यामुळे प्रशासन व नागरिकांची जबाबदारी आणखी वाढली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी जिह्यात 4 हजार 725 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 216 तर ऍन्टीजेन चाचणीत 215 व मागील 123 असे 554 नवे कोरोनाबाधित मिळून आल़े यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 61 हजार 576 झाली आह़े सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आह़े अजूनही चिपळूण व रत्नागिरी तालुक्यात रुग्णवाढीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.
मागील 24 तासांमध्ये 33 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े जिह्यातील मृतांची एकूण संख्या आता 1 हजार 771 व मृत्यूदर हा 2.88 झाला आह़े मंगळवारी बरे झालेल्या 305 जणांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची संख्या आता 53 हजार 879 आह़े बरे होण्याचे प्रमाण 87.65 आह़े जिह्यात मंगळवारपर्यंत 5 हजार 926 रुग्ण उपचाराखाली आहेत़