प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आह़े मागील 24 तासामध्ये तब्बल 2 हजार 305 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये 484 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ चाचण्यांच्या तुलनेत रूग्णांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून †िमळालेल्या माहितीनुसार, शनिवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 245 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 239 कोरोनाबाधित अशा एकूण 484 रूग्णांची नोंद करण्यात आल़ी यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 166, दापोली 40, खेड 54, गुहागर 32, चिपळूण 90, संगमेश्वर 32, मंडणगड 0, लांजा 29 व राजापूर 41 असे रूग्ण आढळून आल़े तर मागील 24 तासामध्ये कोरोनापासून बरे झालेल्या 653 जणांना घरी सोडण्यात आल़े यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 19 हजार 843 इतकी झाली आह़े
तर शनिवारी जिह्यामध्ये 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नेंद करण्यात आली आह़े मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 5, संगमेश्वर 2, गुहागर 2, लांजा 3, राजापूर 2, चिपळूण 3 तर खेडमध्ये 1 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा जिह्यातील एकूण मृतांची संख्या आता 791 इतकी झाली आह़े तर मृत्यूदर 2.99 इतका आह़े जिह्यात आता 7 हजार 751 रूग्ण उपचारात असल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळाली आह़े