नव्याने 345 कोरोनाबाधित
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत असून रुग्णसंख्याही कमी झाली आह़े मंगळवारी जिह्यामध्ये नव्याने 345 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल़े तर 14 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नेंद करण्यात आली आह़े यामुळे जिह्यातील एकूण मृतांची संख्या 944 पर्यंत पोहोचली आह़े
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी करण्यात आलेल्या 1 हजार 231 टेस्टपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 216 तर ऍन्टिजेन टेस्टमध्ये 129 असे 345 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 940 इतकी झाली आह़े तर मागील 24 तासांमध्ये 14 मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यातील 6, चिपळूण 3, लांजा 1, राजापूर 2, दापोली 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा एकूण मृतांची संख्या 944 इतकी झाली आह़े तर मृत्यूदर 3.05 इतका आह़े मृतांच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार, रत्नागिरी 267, खेड 103, गुहागर 40, दोपाली 82, चिपळूण 187, संगमेश्वर 132, लांजा 55, राजापूर 68, मंडणगडमध्ये 10 मृत्यूंची नोंद करण्यात आली आह़े
एकूण रुग्ण -30940
नवे रुग्ण -345
एकूण मृत्यू -944
मृत्यू – 14