16 हजार रुपये रोख रक्कम जप्त : 15 जणांवर कारवाई
प्रतिनिधी / सातारा
जिह्यात विविध ठिकाणी जुगार अड्डयावर छापे टाकून पोलिसांनी सुमारे 16 हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी 15 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अनेक वेळा कारवाया करुन देखील जिल्हय़ातील त्याच त्याच ठिकाणी मटका व्यवसाय सुरुच आहे. मटका पूर्णपणे बंद होण्यासाठी मटक्याच्या अड्डामालकांची गुन्हय़ाची मालिका पूर्ण होत आली असेल त्यांच्यावर एमपीएडी कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी समोर येत आहे.
जिल्हय़ात विविध ठिकाणांमध्ये केलेल्या कारवाईत दहिवडी ता. माण गावच्या हद्दीत साईप्रसाद कलेक्शनच्या बाजूस उघडय़ावर मंगेश प्रकाश पवार (वय 34, रा. वडूज, ता. खटाव) हा जुगार घेताना आढळून आला त्याच्याकडून 1 हजार 55 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. मलकापूर ता. कराड गावच्या हद्दीत मलकापूर फाटय़ाजवळ दत्तात्रय मारुती कोरडे (रा. मलकापूर) त्याच्याकडून 425 रुपये रोख व जुगाराचे साहित्य, कराड शहरातील गुरुवार पेठ येथे संजय महादेव कोळी (रा. भाजी मंडई, गुरुवार पेठ, कराड) त्याच्याकडून 552 रुपये रोख व जुगाराचे साहित्य, सातारा येथील गुरुवार परज नजीक पत्र्याच्या शेडच्या आडोशाला रोहन बाळासाहेब कांबळे (रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्याकडून 1 हजार 650 रुपये रोख व जुगाराचे साहित्य, गोडोली, ता. सातारा येथील श्री सेवा अपार्टमेंट येथे असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला शाहिद शब्बीर सय्यद (रा. प्रतापगंज पेठ, सातारा), सनी धनाजी भिसे (रा. बुधवार पेठ, सातारा) यांच्याकडून 590 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
कोडोली, ता. सातारा गावातील देगाव फाटा पालकर मटण शॉप शेजारी असलेल्या पान टपरीवर शंकर व्यंकट पवार (रा. अंगापूर ता. सातारा) येथे समीर सलीम कच्छी, (रा. मोळाचा ओढा, सातारा) यांच्याकडून 760 रुपये रोख व जुगाराचे साहित्य, रेठरे बुद्रुक ता. कराड गावच्या हद्दीत विकास सेवा सोसायटीच्या जवळ गौस मुजावर याच्याकडून 850 रुपये रोख व जुगाराचे साहित्य, पाटण ता. पाटण येथील शालीमार बारच्या भिंतीच्या आडोशाला संतोष रघुनाथ लाघवे (रा. सुळेवाडी, ता. पाटण) याच्याकडून 4 हजार 650 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
कठापूर, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या आडोशाला तेथीलच अधिकराव रामचंद्र जाधव आणि दत्तात्रय उमाजी मदने (रा. गोगावलेवाडी, ता. कोरेगाव), शाहरुख काझी (रा. कोरेगाव) यांच्याकडून 4 हजार 10 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, वाठार स्टेशन, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत तेथीलच अमर विश्वास दोरके याच्याकडून 395 रुपये रोख व जुगाराचे साहित्य, साखरवाडी ता. फलटण गावच्या हद्दीतून तेथीलच लक्ष्मण शंकर खरात याच्याकडून 920 रुपये रोख व जुगाराचे साहित्य अशी एकूण 15 हजार 857 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.