मंगळवारी कोरोना रूग्ण संख्येत घट
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत असली तरी अद्याप 629 वाडय़ा -वस्त्या कोरोनाबाधित क्षेत्रात आहेत़ या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आह़े यामध्ये 100 टक्के तपासणी तसेच निर्बंधही असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रूग्णसंख्येत घट झाली आह़े जिह्यात नव्याने 233 कोरोनाबाधित मिळून आले आहेत़ एकूण 7 हजार 804 चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचणीत 110 तर ऍन्टीजेन चाचणीत 123 रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 68 हजार 959 झाली आह़े कोरोना चाचण्यांची संख्या वाढूनही रूग्णसंख्या कमी दिसत आह़े
मागील 24 तासात 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये रत्नागिरीमध्ये 9 तर लांजा व संगमेश्वरमध्ये प्रत्येकी एका कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. जिह्यातील मृतांचा एकूण आकडा आता 1 हजार 969 झाला आह़े मंगळवारी 238 बरे झालेल्यांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या आता 63 हजार 821 झाली आह़े रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आह़े
जिल्हा रूग्णालयाकडील आकडेवारीनुसार 3 हजार 183 रूग्ण उपचाराखाली आहेत़ यामध्ये 2 हजार 640 रूग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नसून 543 लक्षणे असलेले रूग्ण उपचारात दाखल आहेत़ आरटीपीसीआर चाचणीत जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 4.73 आह़े
एकूण रूग्ण -68959
नवे रूग्ण -233
एकूण मृत्यू -1969
मृत्यू – 11