कोल्हापूर/ प्रतिनिधी
जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
35 दिवसांपूर्वी राहुल आवाडे पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला होता. याच कालावधीत आवाडे कुटुंबातील एकूण 18 जण कोरोना बाधित झाले होते. सगळे कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा आवाडे कुटुंबाला कोरोनाचा विळखा बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर दुसऱ्यांना होणे ही पहिलीच घटना आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या मोहिमेला प्रतिसाद द्यावा असे आवाहन आवाडे यांनी केले आहे.