सांगरूळ / प्रतिनिधी
जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर या रक्तपेढीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर यांच्या प्रयत्नातून सायकल रिसायकल हा उपक्रम गेले वर्षभर दुर्गम भागात राबवला जात असून त्याचा लाभ वहातुकीच्या सुविधा नसलेल्या आणि सायकल घेण्याची परिस्थिती नसलेल्या गोरगरीब मुला मुलींना होत असून त्यांची होणारी पायपीट थांबणार आहे.
या उपक्रमातून ऑनलाईन शिक्षणा पासून दूर पण शिक्षण आले दारी उपक्रम राबवणाऱ्या शाहूवाडी तालक्यातील अनुस्कुरा भागात वाकीचा धनगरवाडा, मोसम धनगरवाडा, मुसलमानवाडी, पाटीलवाडी येथून चार कि.मी. पायी चालत जावून शिक्षण घेणाऱ्या २४ गरजू विद्यार्थ्यांना सायकल रिसायकल या उपकरमा अंत्तर्गत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी उमेद फाउंडेशनचे कार्यकर्त्ते व प्रकाश घुंगूरकर यांचेकडून धनगरवाड्यावरील अबालवृद्धांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला व सर्वां सोबात एकत्रित बसून फराळाचा आस्वाद घेतला गेला.
यावेळी सायकल मिळाल्याने सर्व मुलांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. यावेळी केंद्र शाळा अनुसकुराचे मुख्याध्यापक व उमेद फाउंडेशनचे सदस्य दशरथ आयरे, सलीम कागवडे, अनिल कांबळे, अमोल काळे, प्रशांत चोडणकर, संतोष हळ्ळी, प्रसाद बिंदगे, सूर्यकांत जांभळे, व प्रकाश गाताडे उपस्थित होते.
या उपक्रमास उमेद फौंडेशनचे प्रमुख प्रकाश गाताडे यानी विशेष परीश्रम घेतले. पुढील शैक्षणिक वर्षात २००-विद्यार्थ्यांना या सायकल रिसायकल उपक्रमातून लाभ देण्याचा संकल्प प्रकाश घुंगूरकर व प्रकाश गाताडे यांनी केला आहे.
