ऑनलाईन टीम/तरुण भारत
आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्या वादानंतर आता महापौरांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौर पेडणेकर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना गुरुवारी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर पोलिसांत तक्रार दाखल करणार असून कुटुंबियांसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहेत. या पत्रात माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका अशा आशयाचे पत्र महापौर यांना पाठवण्यात आले आहे. यांनतर महापौर पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचं वृत्त शुक्रवारी सकाळी आल्यानंतर त्यावर दुपारी खुद्द महापौरांनीच पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी पत्रातला मजकूर सांगताना महापौर किशोरी पेडणेकर यांच्या डोळ्यात अश्रू आले. पत्रात करण्याच आलेले शब्दप्रयोग क्लेशदायक असल्याचं यावेळी महापौरींनी सांगितलं. तसेच, “मला काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या कुटुंबाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही”, असं महापौरांनी ठणकावून सांगितलं आहे.