अभिनेता वरुण धवनचा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट मागील काही काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटासाठी वारंवार नवी माहिती समोर येत आहेत. आता चित्रपटाच्या कलाकारांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. या चित्रपटात वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ची लोकप्रिय अभिनेत्री एलनाज नौरोजीची एंट्री झाल्याचे वृत्त आहे.

चित्रपटात एक पार्टी सिक्वेंस असून वरुण आणि एलनाज लवकरच या गाण्याचे चित्रिकरण सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले. या गाण्यात अनिल कपूर आणि मनीष पॉल देखील दिसणार आहेत. ‘जुग जुग जियो’मध्ये वरुण धवनसोबतच कियारा आडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
या चित्रपटातून युटय़ूबर प्राजक्ता कोळी देखील दिसून येणार आहे. प्राजक्ताचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटात दोन पिढय़ांमधील जोडप्यांची कहाणी दर्शविण्यात येणार आहे. चित्रपट उत्तर भारतीय कुटुंबावर बेतलेला असेल. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे मानले जात आहे.