बेंगळूर/प्रतिनिधी
लसीकरणाबाबत जुलै महिन्यासाठी बीबीएमपीने मोठं नियोजन केलं आहे. बीबीएमपीने लसीकरणाची गती वाढवून जुलै महिन्यात ७० टक्के लसीकरण करण्याची योजना आखली आहे.
शहरात जवळजवळ सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत बृह महानगर पालिकेने डोर-टू-डोर सर्वेक्षण सुरू केले आहे. एकदा शोध सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर, नागरी संस्थेने पहिल्यांदाच त्यांच्या पहिल्या लसीसाठी पात्र असलेल्या लोकांच्या घरांच्या जवळ लसीकरण शिबिरे घेण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. या सर्वेक्षणात अधिकाऱ्यांनी सांगितले, ३० प्रवर्गातील बहुतेक प्राधान्य गटाचा समावेश करण्यास मदत होईल, ज्यात विद्यार्थ्यांसह प्रौढ लोकांमध्ये विनामुल्य लसीकरण करण्याची परवानगी देण्यात येईल.
शहरासाठी लसीकरणाची जबाबदारी सांभाळणारे बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता म्हणाले, “आम्ही लसाीचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. काहीजण प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रापासून बरेच दूर राहिल्यामुळे काहींना लसी देणे अशक्य आहे. सर्वेक्षण आम्हाला प्रत्येक मतदारसंघातीलअशा लोकांची ओळख पटवण्यास मदत करेल. त्यानुसार आम्ही त्यांच्या घरांच्या जवळ लसीकरण शिबिरे आयोजित करू. ” असे ते म्हणाले