हुबळी/प्रतिनिधी
माजी आमदार आणि जद (एस) नेते मधु बंगारप्पा यांनी आज हुबळी येथे काँगेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यावेळी प्रभारी रणदीप सुरजेवाला, केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थिती होते.
दरम्यान, बुधवारी पत्रकार परिषद घेत बंगारप्पा यांनी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि कर्नाटकातील पक्षाचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते.
“एक नवीन सुरुवात, एक नवीन प्रारंभ …. तरीही तोच जुना वारसा चालू आहे … आमचे मोठे नेते, दिवंगत श्री. एस. बंगारप्पा …… आमचे तरुण आणि गतिशील, मधु बंगारप्पा यांना! !!, “रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले.
मधु हे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस. बंगारप्पा यांचे पुत्र आहेत आणि ते एकदा सोरबमधून आमदार म्हणून निवडून गेले होते. आमदार असताना त्यांनी सोरबच्या विकासासाठी काम केले आहे. त्यांचं काँग्रेसमध्ये येणं पक्षासाठी फायदेशीर ठरेल.