सावंतवाडी / प्रतिनिधी-
शहरात कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी प्रभागांमध्ये ‘रॅपिड टेस्ट’ करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेच विशेष पथक प्रभागवार काम करणार असून आज प्रभाग २ व ६ मधील नागरिकांसाठी काझी शहाबुद्दीन हॉल, गुरुवारी ७ व ८ प्रभागासाठी सालईवाडा वृद्धाश्रम, शुक्रवारी ५ व ४ प्रभागासाठी शाळा नं २, शनिवारी १ व ३ प्रभागासाठी वैश्यभवन याठिकाणी नागरीकांची क़ोरोना तपासणी होणार आहेत. ज्यांची तपासणी करण्याची इच्छा आहे, ज्यांना लक्षण आहे अशाच लोकांसाठी हि टेस्टींग सेवा दिली जाणार आहे. तर घरोघरी, सरसकट टेस्टींग होणार नसून इच्छा असलेल्यांचीच टेस्ट होणार आहे. यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी केले आहे. सदयस्थितीत शहरात १०७ सक्रीय रुग्ण आहेत. हे प्रमाण रोखण्यासाठी तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.