कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची दक्षता

प्रतिनिधी / बेळगाव
देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्मयता आहे. काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाल्याने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच पोटनिवडणुकीवेळी मतदानासाठी बाहेर पडणाऱया ज्येष्ट नागरिकांच्या आरोग्याची दक्षता निवडणूक आयोगाने घेतली आहे. 60 वर्षांवरील ज्येष्टना पोस्टल मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. याकरिता बीएलओ मार्फत नोंदणी करून घेण्याचे काम सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ज्येष्ट नागरिकांना याचा अधिक धोका आहे.
विविध ठिकाणी पोटनिवडणुका आणि विधानसभा निवडणुका असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची दक्षता निवडणूक आयोगाने घेतली आहे. ज्येष्ट नागरिकांनी मतदान केंद्रावर येवून मतदान करण्याऐवजी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परराज्यात कार्यरत असणाऱया सरकारी सेवेतील अधिकाऱयांना किंवा कर्मचाऱयांना पोस्टल मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे आता 60 वर्षांवरील वृद्धांनादेखील पोस्टल बॅलेटपेपरद्वारा मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही दखल घेतली आहे. तसेच आजारी असलेल्या वृद्धांना घराबाहेर पडून मतदान करता येत नाही. त्यामुळे मतदानापासून वंचित रहावे लागते, अशा मतदारांसाठी ही सुविधा उपयोगी ठरणार आहे. मतदानादरम्यान पोस्टल बॅलेटपेपर ज्ये÷ नागरिकांना घरपोच देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या मर्जीनुसार मतदान झाल्यानंतर पोस्टाद्वारे पाठविता येवू शकते.